कर्जतमध्ये रंगली संगीत मैफल

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील श्री कपालेश्‍वर मंदिर देवस्थानतर्फे श्री महाशिवरात्रीनिमित्त स्वरबरसात इव्हेंट प्रस्तुत, तोचि खरा साधू, तोचि खरा संत ही सुप्रसिध्द गायक, संगीतकार स्व. सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी गायलेल्या गीतांची विवेक भागवतनिर्मित संगीत मैफल रंगली. या मैफलीत गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतकर मंत्रमुग्ध झाले.

संगीत मैफलीचे आयोजन श्री. कपालेश्‍वर मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र बोडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संगीत मैफलीचा शुभारंभ करण्यात आला. या मैफलीत ज्योती कलश….., कानडा राजा….., आदि माया….., तोच चंद्रमा….., आज चांदणे उन्हात हसले….., सखी मंद झाल्या तारका….., का रे दुरावा….., स्वयें श्रीराम प्रभू….., राम जन्मला….., स्वयंवर झाले….., सेतूबांधा रे….., अशी पाखरे येती….., तोचि खरा साधू….., फिटे अंधाराचे जाळे….., जिवलगा कधी रे येशील तू….., स्वर आले….., एकाच या जन्मी जणू….., धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना….., आहो सजणा दूर व्हा….., ने मजसी ने….. अशी एका पेक्षा एक सरस गीते सारेगमप फेम गायिका जयश्री करंबेळकर आणि सुर नवा ध्यास नवा फेम प्रणय पवार यांनी सादर केली. त्यांना तबल्यवर विवेक भागवत, सिंथेसायझर वर नरेंद्र सकटे आणि ऑक्टोपॅड वर यश हजारे यांनी साथ संगत दिली. अनुया गरवारे – धारप यांनी खास शैलीत निवेदन करून मैफलीत रंगत आणली.

याप्रसगी ऍड. राजेंद्र निगुडकर, राहुल वैद्य, विजय बेडेकर, पांडुरंग गरवारे, जयेश भट, विराज वैद्य, आनंद कुलकर्णी, ईश्‍वर आरेकर, दत्तात्रेय भागवत, मिलिंद धारप, प्रज्ञा परांजपे, संतोष वैद्य, गणेश खराटे, गोविंद तीर्थकर, रीमा वैद्य, शैलेश सातपुते, अभिजीत मराठे, प्रशांत कारुळकर, सदानंद जोशी, संदीप भोईर, आशिष गोखले, समीर सोहनी आदींसह कर्जतकर उपस्थित होते.

Exit mobile version