‘सुर नवा ध्यास नवा’मध्ये कर्जतच्या भावेशचा समावेश


नेरळ | प्रतिनिधी |
लहानपणापासून गायनाची आवड असलेला आणि संगीत क्षेत्रातील विविध परीक्षा देत परिपक्व गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला तरुण भावेश खाडे हा कलर्स मराठी वरील सुर नवा ध्यास नवा या रिलिटी शो मध्ये आपली कला पेश करीत आहे.अभियांत्रिकी पदवीधर असलेला हा तरुण कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा या गावातील रहिवाशी आहे.
खाड्याचापाडा गावातील विष्णू दुंदा खाडे हे भारत दूरसंचार निगममध्ये नोकरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व. खाड्याचापाडा येथून वांगणी येथील विद्या विकास शाळेत येवून दहावी पर्यंत शिक्षण घेत असताना आपली मोठी बहीण हिच्या सोबत संगीताचे धडे भावेश विष्णू खाडे हा गिरवत होता.त्या शाळेत संगीत विशारद असलेले शिक्षक संगीताचे शिक्षण देत असल्याने रेश्मा खाडे ही त्याच्या मोठ्या काकांची मुलगी आणि भावेश हे दोघे त्यांचा गळा गोड असल्याने अल्पावधीत शाळेतील संगीत शिक्षक यांचे आवडते शिष्य बनले.तर संगीत विशारद विद्या जाईल आणि दिवंगत गणेश जाईल दांपत्य हे ठाणे येथून वांगणी गावात येवून संगीत अकॅडमी चालवीत असल्याने त्यांच्याकडे भावेश शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेवू लागला. त्यातून पाचवी ते नववी मधील संगीताचे शिक्षण भावेश ला गौरव महाराष्ट्राचा या रिलिटी शो पर्यंत घेवून गेला होता.त्यावेळी अकरावी बारावी चे शिक्षण घेत असलेल्या भावेश ने नंतर संगीताचे धडे गिरवत असताना भरत खाडे यांच्या तबला विशारद या गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ देखील घेत आपल संगीत आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करीत होता.संगीत शिक्षिका कानका दलाल यांचा देखील भावेश खाडे यांच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा राहिला आहे.
भावेशने यापूर्वी अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला असून एका मराठी चित्रपटातील एका गाण्याचे पार्श्‍वसंगीत भावेशने दिले आहे. संगीताचे शिक्षण घेत असताना अभियांत्रिकी शाखेची पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून भावेश हा अंबरनाथ येथील कंपनीत नोकरी करीत आहे.तर सुर नवा ध्यास नवा हा रिलिटी शो चे ऑडिशन सुरू झाले आणि राज्यातील 5000 तरुण गायक यांच्या मधून सहभागी झाले होते. त्यातून आघाडीचे 50 गायक यांची मेगा ऑडिशन झाली आणि त्यातून त्याची निवड मुंबई येथील स्टुडिओ मध्ये तिन्ही परीक्षक यांनी अंतिम 16 जणांची निवड केली आहे.त्यात कर्जत तालक्यातील भावेश विष्णू खाडे हा तरुण गायक याची निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल भावेश चे कौतुक होत असून भावेश सह त्याची लहान बहीण आणि आई विशाखा तसेच चुलत बहीण तसेच सख्खी चुलत बहीण रेश्मा जोशी यांना आनंदाला पारावर राहिला नाही.भावेश क्या अंतिम 16 मधिल निवडीबद्दल कर्जत तालुक्यातील आगरी युवा ग्रुप ने त्यांच्या घरी जावून सत्कार केला.त्यावेळी मिलिंद विरले,किशोर घारे,हरेश सोनावले,भगवान जामघरे तसेच निलेश कराळे हे उपस्थित होते.

Exit mobile version