कर्जतच्या गद्दार आमदाराला धडा शिकविणार; ठाकरे गटाचा इशारा

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि शिवसैनिकांनी शिवसेना पक्षाचा आणि धनुष्यबाण चिन्हावर आमदार निवडून आला आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या नावावर निवडून यायचं आणि नंतर गद्दारी करायची हे पक्षासाठी नवीन नाही. परंतु अशा गद्दार लोकांना जनताच घडा शिकवते, असा विश्‍वास शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संघटक भरत भगत यांनी व्यक्त केला. नेरळ येथे जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी गद्दार पदाधिकारी यांची पक्षाने तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी या मेळाव्यात केली.

बापूराव धारप सभागृहात शिवसेनेच्या नेरळ जिल्हा परिषद गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तम कोळंबे, सुनील पाटील, बाबू घारे, सुदाम पवाळी, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, सावळाराम जाधव, प्रथमेश मोरे, सुरेश गोमारे, दशरथ भगत, देशमुख, निवृत्ती झोमटे, सुधाकर देसाई, विश्‍वजीत नाथ, सुमन लोंगले, अ‍ॅड. संपत हडप, प्रमोद सुर्वे, रोहिदास मोरे, खोपोली शहर प्रमुख तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बाबू घारे, संजय मनवे, अजय गोरी, संतोष जमघरे, उत्तम कोळंबे, सुनील पाटील, सुदाम पवळी यांनी मनोगते व्यक्त केली.

या मेळाव्यात जयराम उघडा, गोविंद दरवडा, बाळू निरगुडा, जनार्दन निरगुडा, भालचंद्र पारधी, गणेश निरगुडा, हेमंत बांगारी, भास्कर निरगुडा, राजेश पिरकड या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने उत्तम कोळंबे यांनी उमरोली जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख म्हणून योगेश भोईर-मालेगाव यांची तर दहिवली पंचायत समिती गण विभागप्रमुख रविंद्र पेरणे तर विभाग संघटक म्हणून मिलिंद सोनावणे, सावेळे जिल्हा परिषद गटाच्या महिला आघाडी संघटक म्हणून योगिता कोळंबे यांची तसेच भरत शेंडे यांची आसल पाडा शाखा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्याचवेळी कळंब जिल्हा परिषद गटातील मानिवली शिवसेना शाखेचे भरत गवळी, जयवंत पाटील, भारत पाटील, समाधान गवळी, जगदीश खाडे या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Exit mobile version