| बंगळुरु | प्रतिनिधी |
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दि.10 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी दणक्यात झाली. सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेस, धर्मनिरेपक्ष जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आदींनी आघाडी उघडली आहे. अनेक वाहिन्यांतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा दणका बसून काँग्रेस सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविल आहे. दि.13 रोजी मतमोजणी होणार आहे.