महाराष्ट्र मंत्र्यांचा कर्नाटक दौरा रद्द; मुख्यमंत्र्यांची घोषणा

| मुंबई | प्रतिनिधी |

सीमाभागातील मराठी बांधवांशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि.6) होणारा राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई यांचा कर्नाटक दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला. यानंतरही कर्नाटक सरकारडून महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना पाणी सोडण्यात आल्याने आणि आक्रमक वक्तव्य करण्यात आल्याने तणावात भर पडली. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे उद्या सीमा भागात जाऊन मराठी बांधवांची भेट घेणार होते. पण आता त्यांचा हा दौरा तूर्त रद्द करण्यात आला असून तो लांबवणीवर टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून टोकाची भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकमधील सीमावाद वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच सीमावाद चिघळू नये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून मंत्र्यांना तूर्त दौर्‍यावर न जाण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे. सीमाभागातील पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री शिंदे हे पुढील रणनीती आखणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विनाकराण यासंदर्भात नव्या वाद सुरु करणं चुकीचे आहे. मंत्र्यांच्या हा दौरा महापरिनिर्वाण साठी होता. एका कार्यक्रमाल मंत्री जाणार होते. यासंदर्भात कर्नाटकच काही म्हणणं आहे. महाराष्ट्राच देखीलं म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतू महापरिनिर्वाण दिनी आपण अशा प्रकारचा वाद तयार करयाचा का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून काही ना काही विचार सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री
Exit mobile version