| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड क्रिकेट संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याआधी इंग्लंड लायन्स संघ भारत अ विरुद्ध तीन चार दिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंड लायन्स संघाच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचाही समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडचे पुरुष एलिट वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक नील किलीन हे या दौऱ्यावर इंग्लंड लायन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर भारताचा आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो फलंदाजी सल्लागार म्हणून संघात सामील होणार आहे. दौरा सुरू होण्यापूर्वी दिनेश कार्तिक जवळपास नऊ दिवस संघासोबत असेल.
इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ वेळापत्रक
12-13 जानेवारीः इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम- ग्राउंड बी
17-20 जानेवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम
24-27 जानेवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम
1-4 फेब्रुवारी: इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम







