महामार्गावर विठूनामाचा गजर

। नेरळ । प्रतिनिधी ।
येत्या 20 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी येत असून आळंदी येथे उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने वारकरी पायीवारीने पोहचत असतात. कर्जत तालुक्यातून वारकर्‍यांच्या पायी दिंड्या रवाना होत आहेत. खांडस,पिंपळोली,नेरळ, हालिवली या भागातून या दिंड्या हरिनामाचा जप करीत आळंदीच्या वाटेवर आहेत.

कार्तिकी एकादशी साठी वारकरी दरवर्षी आळंदी येर्थे संत ज्ञानेश्‍वर माउली यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात.कर्जत तालुक्यातील शेकडो भाविक आळंदि यात्रेला जात असतात. त्यातील बहुसंख्य वारकरी हे पायी दिंडी घेऊन जात असतात.20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने अनेक पायी दिंड्या आळंदी च्या डफीशेने प्रस्थान करीत आहेत. खांडस येथून कैलास महाराज भोईर यांची पालखीने 13 नोव्हेंबर रोजी प्रस्थान केले तर श्री संत ज्ञानोबा तुकोबा मंडळाची पालकाही नेरळ येथून आळंदि कडे रवाना झाली. तर विजय हमहाराज पाटील यांची पायी दिंडी पिंपळोली गावातून नेरळ मार्गे रावण झाली आहे.

हि पालखी नेरळ येथे हनुमान मंदिर अशी नेरळ मधील वारकरी यांच्या सोबतीने आळंदी कडे रवाना झाली. कर्जत हालिवली येथून जेष्ठ हभप राणे महाराज यांची कोकण दिंडी उद्या आळंदि कडे प्रस्थान करणार आहे. आळंदि मध्ये येणार्‍या पायी दिंडी मध्ये राणे महाराज यांची पालखी सर्वात मोठी असते. मात्र हरिनामाचा गजर करीत निघालेल्या या पायी पालख्यांमुळे रस्ते मार्गांवर वारकर्‍यांची आणि त्यांच्या हाती असलेल्या भगव्या ध्वजांची गर्दी दिसून येत आहे.

Exit mobile version