करटोली भाजीला गृहिणींची पसंती

। माणगाव । प्रतिनिधी ।

पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेड लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात सतत धार पडणार्‍या पावसामुळे रानावनात तयार होणार्‍या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्या ग्राहकांचे पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारे रानातील फळ भाजी म्हणजेच करटोली होय.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेतून येत असून यावर्षी एका किलोला 200 रुपये एवढा भाव मिळत आहे. आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते. तालुक्यातील आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 20 रुपये यावर्षी करटोलीची भाजी महाग झाली आहे.

Exit mobile version