| कोर्लई | वार्ताहार |
सरत्या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या 2024 वर्षाच्या स्वागतासाठी जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या काशीद-बिच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनात पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळते आहे.काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते.पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पँरेसेलिंग बोट,बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते.याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रँफिक जँमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड, स्थानिक, स्टालधारक, ग्रामपंचायत चे सहकार्य लाभते. पोलीस ही आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतात. ग्रामपंचायत तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्रीसदस्य, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने समुद्र किनारा चकाचक करण्यात येत असतो. आतापासूनच याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी दिसून येते आहे