प्लास्टिक संकलनासाठी काशिदचा पुढाकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता सुविधेच्या दृष्टीने जिल्हा स्वच्छता कक्षाकडून पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी येथील सर्व स्टॉल धारक प्रतिनिधी, कॉटेज प्रतिनिधी, हॉटेल संघटना प्रतिनिधी, कचरा व्यवस्थापक ठेकेदार, काशिद सरपंच नम्रता कासार, वर्षा दिवेकर, संतोष राणे, विलास मोरे, मयूरी धारवे, तुलसा पवार, इतर मान्यवर नरेश मरवाडे, अमित खेडेकर, विलास दिवेकर, सुशांत ठाकूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि मान्यवर ग्रामस्थ सी.आर.पी, मुख्याध्यापक, बचतगट अध्यक्ष यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी प्लास्टिक संकलन व त्याचे अंतरिम व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती व आम्ही संस्था यांनी भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रत्येक घटकाची असणारी जबाबदारी याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, जयवंत गायकवाड, रविकिरण गायकवाड श्रीमती परेरा, किरण पटेल यांनी प्लास्टिक मुक्त शाळा, निर्मल बचतगट, टाकाऊतून टिकाऊ, लोकसहभागातून प्लास्टिक मुक्ती आदी विषयी मार्गदर्शन केले.

Exit mobile version