। पनवेल । प्रतिनिधी ।
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पदकासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी शौर्य पदक, मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक ही पदके व्यक्ती तसेच अधिकारी/कर्मचारी यांना उल्लेखनीय कामगिरीकरिता दिली जातात. महाराष्ट्र पोलीस दलातील 39 अधिकारी/कर्मचारी यांची गुणवत्तापूर्ण सेवेच्या पदकासाठी राष्ट्रपती यांच्याकडून निवड करण्यात आली असून महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील नेमणुकीतील पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. या पदकासाठी निवड झाल्याने प्रवीण साळुंके मा. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, तानाजी चिखले मा. पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे स्वातंत्र्यदिनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनपर शुभेच्छा देण्यात आल्या.






