महावितरणविरोधात कासू ग्रामस्थ आक्रमक

| गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील कासू विभागात अनियमित व कमी दाबाने विद्युतपुरवठा होत असल्याने महावितरणविरोधात पेण उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा कासू विभागातील ग्रामस्थांनी दिला आहे.

पेण तालुक्यातील सालिंदे-कासू येथे नवीन 63 केव्ही विद्युत जनित्राचे काम युद्धपातळीवर सुरु करावे, विद्युतपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना कळविण्यात यावे व त्वरित चालू करावे, कमी-जास्त विद्युत दाबमुळे मागील दोन-तीन वर्षांपासून जे घरगुती विद्युत उपकरण बिघडले, त्याची नुकसान भरपाई मिळावी, रात्रीच्या वेळी पांडापूर कार्यालयात कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, विद्युत पोलावर व विद्युत वाहक तारांजवळ ज्या गवताच्या वेली, झाडाच्या फांद्या आल्या आहेत, त्या नियमितपणे साफ कराव्यात व येथील विद्युतपुरवठा नियमितपणे चालू ठेवावा आदी मागण्यांसाठी कासू विभागातील ग्रामस्थांनी पेण येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Exit mobile version