कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रम

| नवीन पनवेल | वार्ताहर |
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये व उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रम शिबीर चावणे खुटल्याचा पाडा व पेरूवाडी तालुका पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी आदिवासी प्रकल्प अधिकारी पेण, ग्रामविकास विभाग, वन विभाग, कृषी विभाग, तालुका आरोग्य विभाग, उपजिल्हा रुग्णालय पनवेल, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सेतू केंद्र, महा ई सेवा, आधार कार्ड चालक, ई-श्रम कार्ड चालक, पुरवठा विभाग, संजय गांधी शाखा, ग्रामपंचायत चावणे, उरण सामाजिक संस्था, अर्चना ट्रस्ट, सिपला ट्रस्ट यांनी परिश्रम घेतले. यावेळी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, चेतन गायकवाड उपस्थित होते.

Exit mobile version