रोहित पाटीलांचा राजकारणात यशस्वी प्रवेश
। पुणे । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं असून रोहित पाटील यांचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल 6 आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं.
त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. तर रोहित पाटील यांनी चांगली कामगिरी केली यामुळे त्यांना लोकांनी सत्ता दिली असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
कवठेमहंकाळ नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
