केसीआर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर

| कोल्हापूर | प्रतिनिधी |
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. के चंद्रशेखर राव हे मंगळवारी (दि.1) रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहचणार आहे.

वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर मधील अंबाबाईच्या दर्शनासाठी चंद्रशेखर राव हे जातील आणि तिथून परत हैदराबादला निघतील.

Exit mobile version