। मुंबई । वार्ताहार |
यंदाच्या रणजी हंगामास पाच जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्राचा ‘अ’ गटात समावेश असून मणिपूर, झारखंड, राजस्थान, हरियाना, सौराष्ट्र, विदर्भ, सेनादल हे गटातील अन्य संघ आहेत. या संघात प्रशांत सोळंकी या मुंबईच्या लेगस्पिन गोलंदाजाचा व्यावसायिक खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. या आधी विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत मुंबईकडून खेळणारा प्रशांत सोळंकी चार दिवसांच्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राकडून पदार्पण करेल. प्रशांत सोळंकीच्या बरोबरीने ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज, ओम भोसले आणि धनराज शिंदे हे खेळाडू रणजित पदार्पण करणार आहेत.
महाराष्ट्राचा पहिला सामना सोलापुरात इंदिरा गांधी मैदानावर मणिपूर संघाविरुद्ध पाच ते 8 जानेवारी दरम्यान होत आहे. दुसरा सामना झारखंड संघाबरोबर 12 ते 15 जानेवारी दरम्यान एमसीए मैदान गंहुजे, तिसरा सामना राजस्थान बरोबर 19 ते 22 दरम्यान जोधपूर, चौथा सामना हरियाना संघाबरोबर 26 ते 29 दरम्यान चौधरी बन्सीलाल मैदान, लाही येथे सौराष्ट्र विरुद्ध पाचवा सामना एमसीए मैदान गंहुजे, विदर्भ संघाबरोबर 2 ते 5 फ्रेबुवारी दरम्यान सहावा सामना एमसीए मैदान गंहुजे तर सातवा सामना सेनादल संघाबरोबर 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणार आहे.
संघ : केदार जाधव (कर्णधार), नौशाद शेख, सिद्धेश वीर, अंकित बावणे, निखिल नाईक, अझिम काझी, अक्षय पालकर, ओंकार खाटपे, रामकृष्ण घोष, प्रशांत सोळंकी, हितेश वाळुंज, प्रदिप दाढे, ओम भोसले, विकी ओस्तवाल, धनराज शिंदे, विशांत मोरे.







