जय भवानी ठाणे संघाला उपविजेतेपद
| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील बारावी आर्यन प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचा अंतिम सामना केदारनाथ 11 संघमालक संजय कदम आणि जय भवानी ठाणे, संघमालक शशिकांत शिंदे यांच्यात झाला. अटीतटीच्या सामन्यात केदारनाथ 11 संघाने बाजी मारत आर्यन लीगचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत रायगड-ठाणे-पालघर या तीन जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोयना समाजाचे विठ्ठल मोरे, पांडुरंग साळुंखे, एम.डी. चाळके, बळीराम शिंदे, विष्णू सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख रायगड विजय पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, रोहित विचारे, युद्धविर प्रकाश महाडिक, जितेंद्र सकपाळ, विलास शिंदे, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण मरागजे, गुरुनाथ साठेलकर, राजाराम कुंभार, सरपंच ज्ञानेश्वर सुतार, ज्ञानेश्वर सोगे, संदेश पाटील, उमेश कदम, शंकर निवळे, सुभाष मरागजे, प्रशांत साळुंखे, सुभाष सावंत, संजय कदम, शशिकांत शिंदे, महेश पवार, संतोष सावंत, संदीप साळुंखे, विशाल सकपाळ, निकेत जाधव, राजेंद्र कदम, किशोर शिंदे, जगजीत ओबेरॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष रायगड भूषण जगदीश मारंगजे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, उपाध्यक्ष सुधीर मुसळे, प्रमोद सावंत, सचिव माजी सैनिक प्रवीण सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर मोरे तसेच सर्व सल्लागार व सदस्यांनी मेहनत घेतली. या स्पर्धेत तृतीय क्रमांक क्रिशिव 11 संघ मालक महेश पवार/शुभम सकपाळ, चतुर्थ- निवळी-लामज11 संघ मालक प्रमोद निवळे/सचिन निवळे यांनी पटकावला.