| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीतील मद्य धोरणातील गैरव्यवहारप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई योग्य ठरवली आहे. अटक योग्य की चूक हे कायद्याच्या आधारे ठरते, निवडणुकीच्या वेळेनुसार नाही, अशी टिप्पणी यावेळी उच्च न्यायालयाने केली. यावेळी न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळून लावली.