उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर
| अलिबाग | प्रतिनिधी |
चिंतामणराव केळकर विद्यालय चेंढरे – अलिबाग येथे क्रिकेट अकादमी सुरू करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून यामध्ये उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर सुरू होणार आहे. शिबिरात सर्वांना प्रवेश देण्यात येणार आहे.
सरावासाठी तीन खेळपट्टया तयार करण्यात आल्या आहेत. गोलंदाजीचे यंत्र बसविण्यात आले आहे. या गोलंदाजीच्या यंत्रामध्ये ताशी 100 किमी वेगापर्यंत गोलंदाजी करण्याची सुविधा आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी चिंतामणराव केळकर विद्यालय ही आलिबाग तालुक्यातील पाहिली शाळा आहे. या ठिकाणी मुलांसाठी व मुलींसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत प्रशिक्षक प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
1 एप्रिलपासून सुरू होणार्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात सर्वांना प्रवेश देण्यात येणार आहे. या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात प्रवेश घेऊ इच्छिणार्यांनी चिंतामणराव केळकर विद्यालय चेंढरे – अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.