| म्हसळा | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या कार्यक्रमांतर्गत केलटे ग्रामपंचायती मध्ये गावातील स्वच्छता ग्रामस्थांच्या लोकसहभागातून नदीत मातीचे वनराई बंधारे बाधण्यासाठी सुनियोजित नियोजन करून बंधारे बांधले गेले. या बंधाऱ्या बांधल्यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लिटर पाणी भूगर्भात जिरविण्यात मदत होणार आहे. त्याचबरोबर नदी परीसरातील मातीची होणारी धूप मोठ्या प्रमाणातत थांबणार आहे बाजूला असणारे विहिरी तलाव यांचे देखील पाण्याची पातळी वाढणार आहे. या बंधाऱ्यामुळे पशु-प्राणी यांना देखील एक नवी संजीवनी प्राप्त होणार आहे ग्रामपंचायत सरपंच उमेश पवार त्यांचे सर्व सदस्य यांनी देखील उपक्रमास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या उपक्रमा अंतर्गत स्वच्छतेचे धडे देखील ग्रामस्थांनी गिरवले आहेत.






