केतन डिंगळे याचे निधन

| पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील पंचशीलनगर पाच्छापूर गावचा रहिवासी केतन दिलीप डिंगळे या तरुणाचे रविवारी (दि.4) वयाच्या 29 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

रविवारी सकाळी त्याची तब्बेत अचानक बिघडल्याने त्याला पाली येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, त्याला हृदयविकाराचा त्रास जास्त वाढल्याने डॉक्टरांनी तत्काळ पुढे नेण्यास सांगितले. केतनला रोहयात पुढील उपचारासाठी नेत असताना वेळेअभावी अर्ध्या रस्त्यातच त्याचे निधन झाले. मात्र, केतनच्या निधनाला सुधागड तालुक्याची अपुरी आरोग्य सेवा व वेळेवर न मिळणारी उपचार पद्धती जबाबदार असल्याची भावना त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. केतनच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे. त्याचा पुण्यानुमोदण व शोकसभेचा कार्यक्रम रविवारी (दि.11) पंचशीलनगर पाच्छापूर येथे राहत्या घरी करण्यात येणार आहे.

Exit mobile version