पुणे येथे खादी हस्तकला प्रदर्शन

| पुणे । प्रतिनिधी ।
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) खादी संकल्पनेवर आयोजित स्पार्क 2023 या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन सरिताबेन राठी यांच्या हस्ते झाले. सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी खादी पासून बनवलेल्या विविध 2100 प्रकारच्या कलात्मक उत्पादनांचे सादरीकरण केले आहे. रविवारपर्यंत (दि. 26 मार्च) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले असणार आहे.

खादी हे भारतीय संस्कृती, परंपरेचे दर्शन घडवणारे शांतीचे प्रतीक आहे. सूर्यदत्तफच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, नाविन्यता वापरून वैविध्यपूर्ण अन् सुंदर उत्पादने बनवली आहेत. त्यांच्या या कलाकृती जगभर जाव्यात. नव्या रंगसंगती, कल्पना यातून खादीचे असंख्य उत्पादने तयार करता येतात, हे या प्रदर्शनातून दिसते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीजच्या सरिताबेन राठी यांनी केले.

यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संचालक सचिन इटकर, अनिरुद्ध बडवे, उद्योजिका रितू अग्रवाल, संदीप बर्वे, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा संजय चोरडिया, स्नेहल नवलखा, प्राचार्या प्रा. रेणुका घोसपुरकर, प्रा. पूजा विश्‍वकर्मा, प्रा प्रियांका कामठे आदी उपस्थित होते

Exit mobile version