| जळगाव |वृत्तसंस्था |
एकनाथ खडसे यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळे त्यांना पक्षाने हकालपट्टी केली, असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
दाऊदच्या संभाषणामुळे आपल्याला पक्षातून काढले असे एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नाही. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळाप्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण ठाकरे सरकारने ते टिकवले नाही. आता टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी थोडा वेळ अजून आम्हाला लागला, तर तो द्यावा असे महाजन म्हणाले. आरक्षणाबाबत सरकार गतीने काम करत आहे. जरांगे पाटील यांनादेखील हे पटलेलं असून त्यामुळे जरांगेंकडून मुदतवाढ मिळेल असे महाजन म्हणाले.







