| कोलाड | प्रतिनिधी |
ईएसएफई तसेच टाइम्स ऑफ इंडिया यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शिक्षणाबरोबर महिलांसाठी मेडिकल कॅम्प, महिला सक्ष्मीकरण करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मुलांना मेडिकल चेकअप, मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार दिले जाते. कराटे क्लास, योगा क्लास, तरुणांसाठी करियर गाइडेन्स, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, तसेच वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करण्यात येत आहे. यामुळे ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांबला महाराष्ट्रातून आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काचे आयोजन नेस्को बॉम्बे एक्सिबिशन सेंटर मुंबई येथे दि 11, 12,व 13 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्ञानकूर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या स्कूलचे संस्थापक ऍड रविंद्र लोखंडे, शाळेच्या मुख्यध्यापिका रिया लोखंडे, सोनाली शिंदे, प्रतीक्षा धामणसे, रुपाली मरवडे, दर्शना धनवी, प्रियांका चिकणे, निलेश टवले, ज्ञानेश्वर महाडिक, सायली यांनी मेहनत घेतली. या पुरस्काराबद्दल ज्ञानांकुर स्कूलचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.







