खांब संघ ठरला धाकेश्वर चषकाचा मानकरी

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे आयोजित खांब विभागीय क्रिकेट स्पर्धेत खांब संघाने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करून धाकेश्वर चषकावर आपले नाव कोरले. खांब विभाग क्रिकेट असोसिएशनच्या सहयोगाने व धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हे यांच्या वतीने बाहे येथील भव्य क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन रविंद्र कान्हेकर, भरत कांहेकर, दत्ता सुटे, गणेश टिकोणे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. तर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी धाक्सुद चिल्हे संघ ठरला व देवकान्हे संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रोहित भोईर देवकान्हे, उत्कृष्ट फलंदाज म्हणून विजय खामकर खांब, तर मलिकावीर म्हणून रोहित खामकर खांब यांना तसेच विजेत्या संघांना अमित घाग,नारायण कान्हेकर, रोहिदास सुटे, नितिन भोईर, वसंत शेंडगे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धाकेश्वर मित्र मंडळ देवकान्हेच्या सर्व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version