खारघर पोलिसांकडून शस्त्रासह एकाला अटक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसासह खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मन्नान गुड्डू शेख (19) असे आरोपीचे नाव आहे. तो पनवेल रेल्वे स्टेशननजीकच्या नवनाथ नगर झोपडपट्टीत राहतो.

मन्नान शेख हा खारघर येथील सेक्टर 28 मधील रांजणपाडा स्मशानभूमिजवळ संशयास्पदरित्या रात्री 8.30 वाजता गस्तीवरच्या पोलिसांना आढळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ देशी बनावटीचे 17 इंची लांबी बॅरलचे गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे आढळून आली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना खंडेवाल यांनी गुन्हा नोंदला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप आव्हाड हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Exit mobile version