विज्ञान प्रदर्शनात खरोशी शाळा प्रथम

| खरोशी | वार्ताहर |

रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सु .ए . सो . चे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली पनवेल येथे 29 ते31 येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील 15 तालुक्यातून विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये केंद्रशाळा खरोशी ता. पेण या शाळेतील तनिष घरत व वेद घरत या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रतिकृतीचे सादरीकरण व त्याचा मानवी जीवनात होत असलेला उपयोग यासह अनेक चांगली माहिती सादर केली होती. त्यात जिल्ह्यात 6वी ते 8वी या गटात प्रथम क्रमांक आला. त्यांना उल्हास गावंड सदानंद पाटील, किशोर म्हात्रे, उदय म्हात्रे, राजेंद्र शिंदे ,चेऊलकर यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यात शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत पाटील, केंद्राचे केंद्रप्रमुख सुखचैन, अरूणादेवी मोरे तसेच खरोशी गावातील अबालवृद्धांनी त्याचे कौतुक केले.

Exit mobile version