खाताशिप्रचा क्रीडा महोत्सव उत्साहात

| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंत पाटणकर क्रीडांगणावर जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, डॉक्टर रामहरी धोटे शिशु मंदिर, बी एल पाटील तंत्रनिकेतन, के एम सी कॉलेज, परम .पूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी समारंभाध्यक्ष म्हणून मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम उपस्थित होते.

जंगम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व परमपूज्य पाटणकर सरांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. याप्रसंगी सर्व शाळांच्या पथकांनी उत्कृष्ट संचलन सादर केले. क्रीडांगणावरील शपथविधी तसेच क्रीडाज्योतीचे आगमन अतिशय दिमाखदार पद्धतीने सादर केले गेले. या प्रसंगी राज्य जिल्हास्तरीय प्राविण्य मिळवलेल्या तसेच सुवर्णपदक विजेत्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुगे सोडून कार्यक्रमाचा जल्लोष साजरा केला.

गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व खेळाडूंना संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सदर कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाहक किशोर पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील शालेय समिती अध्यक्ष दिनेश गुरव श्री राम हरी तोटे शिशु मंदिर चे अध्यक्ष विजय चुरी, जनता प्राथमिक शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारी शिवछत्रपती विद्यालय देवन्हावे अध्यक्ष भास्कर लांडगे, सह्याद्री विद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्रजी शहा, माध्यमिक शाळा सावरोली अध्यक्ष अबू जळगावकर.

मंडळ सदस्य हेमंतजी पाटील, राष्ट्रवादी चे विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे माजी नगरसेविका केविना गायकवाड जयंत पाठक , शांताराम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन धर्मेंद्र म्हात्रे सर व सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार यांनी केले.

Exit mobile version