। खेड । प्रतिनिधी ।
28 रोजी खेडमधील परदेशात जाणार्या मुस्लीम नागरिकांना खेड नगरपरिषद दवाखान्यात लसीचे आयोजन केले होते.परंतु ढिसाळ नियोजन अभावी नागरिकांना भिजत उभे रहावे लागले.याची खबर खेड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गौसभाई खतीब व अनिल सदरे यांना मिळताच ते लसीकरण केंद्रावर दाखल झाले.परंतु नागरिकांना भिजत असलेले पाहून त्यांचा राग अनावर झाला.त्यामुळे ते आक्रमक होवून अधिका-याना लसिकरण केंद्रावर बोलावून त्याचा जाब विचारला. यावेळी अनेक महिलांनी संताप व्यक्त केला .सकाळ पासून अनेक नागरिक नंबर लावून उभे होते मात्र सकाळीच पाऊस सुरू झाल्याने अनेक महिला व तरुण यांना छत्री घेऊन उभे राहावे लागले यामुळे अनेक जण पूर्ण पणे भिजले होते.
आबा जोशी –(माजी नगराध्यक्ष )
काही दिवसांपूर्वी आम्ही आधारवड प्रतिष्ठान च्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही मुख्याधिकारी व आरोग्यसभापती यांना पत्र दिले होते की शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तटकरे सभागृहात आहे ते आम्ही मोफत वापरण्यासाठी देण्यात येईल तरी असे लेखी पत्र मी व सहकारी यांनी दिले पण त्या पत्राचा विचार झाला नाही नागरिक पावसात भिजू नये हा हेतू आमचा होता पण नगरप्रशासन ने आमच्या पत्राला गांभीर्याने घेतले नाही यांचे दुःख आहे आमच्या सभागृहात वाहनतळ,व इतर सुविधा आहेत त्याचा लाभ नागरिकाना झाला असता योग्य अंतर ठेवत नागरिकांना लस घेता आली असती पण नागरिकांचा विचार नगरपालिका करत नाही असे दिसते हे खूपच दुर्देवी -(गौस खतीब तालुका अध्यक्ष कॉग्रेस )
खेड नगरपालिका प्रशासनच्या ढिसाळ नियोजनमुळे माझ्या खेड वासीयांना भर पावसात भिजत लस घ्यावी लागली हे खूप दुःख देणारी घटना आहे.खरतर पावसाळा सुरू आहे आपल्याकडे 200लोकांची बसण्याची नव्हे तर उभी राहण्याची सोय नाही मग त्याचे नियोजन करून नंतर च लस देणे गरचे होते एखादे समाजमंदिर किंवा शाळा घेऊन त्यामध्ये लस देने गरजेचे होते मात्र तसे झाले नाही हे खूप दुर्दैवी आहे.