किशोर-किशोरी गटांचा खो-खो संघ जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।
किशोर-किशोरी गटाची 31 वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा उना (हिमाचल प्रदेश) येथे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे किशोर व किशोरी खोे-खो संघ महाराष्ट्र खोे-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.
गेले दिड दोन वर्षात खरेतर खेळाडू मैदानात नव्हते. त्यात या खेळाडूंचा वयोगट 14 वर्षाखालील असल्याने सर्वच संघांना या वयोगटातील खेळाडूंना तयार करणे हे एक प्रकारचे आव्हानच होते. या मैदानी निवड चाचणीसाठी महाराष्ट्रातून 52 मुले व 46 मुली उपस्थित होत्या. त्यामुळे निवडक खेळाडूंमधून महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड करताना निवड समिती सदस्य अजित शिंदे सोलापूर, हरिष पाटिल नंदुरबार, आनंद पवार धुळे व माधवी चव्हाण-भोसले सातारा यांना तारेवरची कसरत करावी लागली.
या संघ निवडीवेळी भारतीय खोे-खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, आयोजक कमलाकर कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version