। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.2) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला कर्जत-पळसदरी येथील राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने फुस लावून कोठेतरी पळवून नेल्याचे प्राथमीक तपासात निदर्शनात आले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी भागवत अधिक तपास करीत आहेत.







