किरॉन पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात

। बार्बाडोस । वृत्तसंस्था ।

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू किरॉन पोलार्ड टी-20 विश्‍वचषकात इंग्लंडच्या विजयासाठी झटताना दिसेल. पोलार्ड सहकारी प्रशिक्षक म्हणून इंग्लिश संघासोबत कार्यरत आहे. 37 वर्षीय पोलार्ड इंग्लिश संघाच्या सराव सत्रात बार्बाडोस येथे दिसला होता. गतविजेच्या इंग्लंडने अलीकडेच पाकिस्तानविरूद्ध 2-0 ने मोठा विजय मिळवला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोलार्डचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो सराव सत्रात खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहे.

डिसेंबर 2023 मध्ये मॅथ्यू मॉटचा कार्यकाळ संपल्यानंतर पोलार्डने इंग्लंड बोर्डाने आपल्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले. पोलार्डच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश संघ अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होत असलेला ट्वेंटी-20 विश्‍वचषक खेळत आहे. पोलार्डच्या मायदेशात होत असलेल्या विश्‍वचषकामुळे त्याला तेथील मैदानांचा अंदाज आहे. पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यातपोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 101 टी-20 सामन्यांमध्ये कॅरेबियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये संघाच्या ट्वेंटी-20 विश्‍वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि 2021 च्या आवृत्तीत तो कर्णधार म्हणून खेळला. 2022 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी, पोलार्ड जगभरातील अनेक टी-20 फ्रँचायझी लीगमध्ये सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिका बजावतो.

Exit mobile version