। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
घरगुती वादातून लाकडी दांडक्याने आणि हत्याराने डोक्यावर मारहाण करून 45 वर्षीय महिलेची हत्या केल्या प्रकरणी आरोपी कमळ्या राघो निरगुडा (55), रा.टावरवाडी, पनवेल यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली महिला शनिवारी गोमा निरगुडा (45), टावरवाडी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तर आरोपी याने त्याच्या पत्नीची यापूर्वी 2008 मध्ये हत्या केली आहे. याप्रकरणी हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. आरोपी कमळ्या निरगुडा हा जेलमधून सुटून आल्यानंतर मृत महिलेसह ते दोघे एकत्र राहत होते. आरोपीला दारूचे व्यसन असल्याने तो निरगुडा यांना दारू पिऊन मारहाण करत असे. 22 ऑक्टोबर रोजी आरोपीने मृत महिलेला लाकडी दांडक्याने आणि हत्याराने डोक्यावर हातावर, पोटावर, पायावर, मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली व त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी कमळ्या निरगुडा याला अटक केली.