| सांगली | वृत्तसंस्था |
सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तीस वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सांगली परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील मयूर यशवंत चव्हाण (30) हा सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअर टेकरचे काम करत होता. सांगली शहरातील राजूनगरच्या मंगळवार बाजारपेठेतील मशिदीपासून काही अंतरावर डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. तसेच, या घटनेबाबत अधिक तपास संजयनगर पोलीस करत आहेत.