पेठेचा राजा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

महिलांमध्ये रेन्बो संघ विजयी
। महाड । प्रतिनिधी ।
आयपीएल प्रीमियर लीगचे फिव्हर गावागावात पोहोचले असून, तरुण खेळाडूंसह ज्येष्ठ खेळाडू एकाच छताखाली येत क्रिकेट खेळाचा आनंद लुटत आहेत. गावगावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाड शहरातील पेठेचा राजा प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा पुरुष संघाचा मानकरी चामुंडा वारियर्सचा संघ अजिंक्य ठरला, तर महिलाच्या रेन्बो संघाने चषक जिंकला.
महाडमधील पेठेचा राजा प्रीमियर लीग स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. यामध्ये दोन महिला संघदेखील सहभागी झाले होते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लीगच्या धर्तीवर खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक संघदेखील सहभागी करण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत चामुंडा वारियर्स संघाने एस पी इगल्स संघावर मात करत पहिल्या प्रीमियर लीगचा मानकरी ठरल. या संघाला रोख 5 हजार व चषक देण्यात आला, तर उपविजेता संघाला 3 हजार व चषक, तृतीय क्रमांक निर्विघ्न रॉकर्स 2 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक स्वानंद फायटर्स 1 हजार व चषक तर रेन्बो वारियर्स महिला संघाने अटीतटीच्या लढतील चॅलेंजर संघाचा एका धावेने पराभव करत विजय मिळवला.
या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज स्वरूप मुळे, उत्कृष्ट गोलंदाज टापरे, तर क्षेत्ररक्षक मिलिंद पवार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मालिकावीर म्हणून निर्विघ्न रॉकर्सचा संघ मालक व खेळाडू संजीवन कोकणे यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये राजू कोकणे, अशोक कोकणे, सुहास तलाठी, धनंजय बागडे, समीर बुटाला, आबा डोळस, दिनेश जैन आदी ज्येष्ठ खळाडूंनी खेळाचा आनंद लुटला, तर रमेश मुळे, संजय शेठ, सुधीर शेठ, निकेत शेठ, राजा बुटाला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Exit mobile version