नेरळ गावातील बत्ती गुल; रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य

। नेरळ । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन पूर्वी ग्रामपंचायत हद्दीमधील रस्त्याच्या दुतर्फा असलेले पथदिवे यांचे विजेची देयके भरली जात होती. मात्र जुलै 2020 पासून राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने त्या त्या ग्रामपंचायतने पथदिवे यांची देयके भरावीत असे आदेश काढले आहेत. दरम्यान,नेरळ ग्रामपंचायत मध्ये झालेले शहरीकरण यामुळे तब्बल 10 वीज मीटर यांच्या माध्यमातून विजेचे दिवे पथदिवे म्हणून प्रज्वलित होत होते. मात्र तब्बल दीड कोटीचे बिल नेरळ ग्रामपंचायत कडून महावितरण कंपनीला देणे आहे.परंतु वीज थकबाकी असल्याने महावितरण विभागाने नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील पथदिव्यांवरील वीज गायब आहेत.

जिल्ह्यातील मोठ्या सर्व ग्रामपंचायती यांनी 2020 पासून त्याबद्दल वारंवार आपल्या कैफियत मांडल्या होत्या. परंतु शासनाने त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने ग्रामपंचायती यांची देयके महावितरण कडे पोहचली नाही आणि त्यामुळे विजेचे कनेक्शन कापले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये दहा वीज कनेक्शन असून त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व रस्त्यांवर असलेल्या पथदिवे यांवरील वीज तो भाग प्रकाशमान होत असतो. नेरळ ग्रामपंचायत कडे महावितरणाचे पथदिवे यांचे जुलै 2020 पूर्वीचे देयक हे साधारण एक कोटींच्या आसपास थकीत आहे. मात्र त्या वेळी ती सर्व रक्कम शासनाच्या तिजोरीतून थेट येत असल्याने महावितरण कंपनी तात्काळ वीज पुरवठा खंडित आकारण्याची कारवाई करीत नव्हते.

मात्र जुलै 20 नंतर शासनाने त्या त्या ग्रामपंचायती यांना वीज देयके भरण्याच्या सूचना आणि आदेश पारित केल्याने नेरळ ग्रामपंचायत आर्थिक संकटात सापडली आहे. नेरळ ग्रामपंचायत कडून मागील काही महिन्यापासूनचे तब्बल 50 लाखाचे वीज बिल नेरळ ग्रामपन्चायत महावितरणला देणे आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व वीज कनेक्शन यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून नेरळ गावातील रस्त्यावर अंधार आहे. त्यात नेरळ ग्रामपंचायत मधील महत्वाची पर्यटन स्थळे असलेल्या राजमाता जिजामाता तलाव आणि हुतात्मा चौक देखील अंधारात आहे.

Exit mobile version