| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील वरसगांव येथील रहिवासी ह.भ.प किसन कोंडू ढोकरे यांचे शुक्रवार, दि 18 जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. ते महावितरण कंपनीत नोकरीला होते. महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले होते. तसेच भजन, कीर्तनात त्यांचा नेहमीच सहभाग होता.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तसेच वारकरी संप्रदयाचे असंख्य नागरिक व समस्त वरसगाव ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, एक बहीण, दोन सुना, जावई, पुतणे, नातवंडे व मोठा ढोकरे परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार, दि.27 जुलै, तर उत्तरकार्य विधी बुधवार, दि. 30 जुलै रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी होणार आहेत.






