वृक्षतोड विरोधात किसान क्रांती संघटना आक्रमक

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जतच्या टोरंट हायड्रो प्रोजेक्टच्या वृक्षतोडीस किसान क्रांती संघटनेचा तीव्र विरोध करण्याची भूमिका जाहीर केली. स्थानिक जंगलाची पाहणी केल्यानंतर किसान क्रांती संघटनेने आदिवासी लोकांशी चर्चा करीत जंगलतोड कायमची थांबली अशी भूमिका घेतली. तर स्थानिकांच्या सोबत राहून आंदोलन करण्याची भूमिका किसान क्रांती संघटनेने जाहीर केली आहे.

कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट हायड्रो प्रोजेक्टमुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीला किसान क्रांती संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र पर्यावरणाचा विनाश करून कर्जत तालुक्याला विनाशाच्या वाटेवर नेणाऱ्या विनाशकारी वृत्तीला आमचा ठाम विरोध आहे, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आघाडीवर राहणार असल्याचे जाहीर केले आहे. भविष्यातही हा लढा असाच सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात आणि कार्यक्रमात किसान क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत राणे, तालुका अध्यक्ष शरद तवले, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ धुळे, जिल्हा संपर्कप्रमुख रामदास माळी, प्रवक्ते सुरेश खानविलकर, महाराष्ट्र राज्य संघटक विनायक देशमुख, रमेश जाधव, साधूराम पाटील, प्रकाश कांबरे, नवनाथ शेळके, रत्नाकर बडेकर, सुरेश राणे, जितेंद्र लेकुरवाले, अनिल गवले, हेमंत कोंडविलकर, धनंजय पाटील, कैलास झांजे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थ आणि कार्यकर्ते जंगलात जाऊन पाहणी केली.

Exit mobile version