। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोलकाता नाइट राइडर्सचने श्रेयस अय्यरल कॅप्टन म्हणून निवडले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे.
आयपीएलच्या मेगा लिलावात कोलकाताने त्याच्यासटी 12. 25 कोटी मोजले होते. याआधी श्रेयस अय्यरनं दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने फायलपर्यंत मजल मारली होती. पण तो दुखापतीमधून संघातून बाहेर पडला आणि त्याची कॅप्टन्सी पंतकडे गेली ती गेलीच.
आयपीएलच्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने अजिंक्य रहाणेलाही आपल्या ताफ्यात घेतलं होते. केकेआरने अजिंक्य रहाणेला संघात का घेतले याचे कारण जान्हवी मेहताने सांगितले होते. ती म्हणाली होती की, मअजिंक्य रहाणे हा अनुभवी खेळाडू आहे. तसेच तो सलामीला येत तो डावाची सुरुवातही करु शकतो. एवढेच नाही तर त्याने राजस्थानचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे संघाला त्याचा फायदा होईल. तिच्या या वक्तव्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स अजिंक्यकडे नेतृत्व देणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अनुभवाशिवाय कोलकाताने युवा श्रेयस अय्यरवर भरवसा दाखवत कॅप्टन्सीच्या प्रश्नाचा निकाल लावला आहे.
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरवर सक्षमपणे बोली लावण्यास आम्ही यशस्वी ठरलो. तो एक प्रतिभावंत खेळाडू असून ढशराघघठ च्या नेतृत्वासाठी तो सक्षम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ दमदार कामगिरी करील. – वेंकी मैसूर, केकेआरचे सीईओ