| नेरळ | वार्ताहर |
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी अनेक महागड्या शस्त्रक्रिया कमी खर्चात करण्यात हक्काचे ठिकाण म्हणून रायगड हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेन्टर जवळचे रुग्णालय बनत आहे. या रुग्णालयात हृदयरोगच्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या असून आता गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असून वांगणी येथील 56 वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी केशरी आणि पिवळे रेशनकार्ड असलेल्या रुग्णांसाठी जवळचे रुग्णालय उपलब्ध झाले आहे.
आयेशा बेगम या महिला रुग्ण रायगड हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंट्ररमध्ये गुडघ्यावरील उपचारासाठी येत होत्या. वैद्यकीय पथकाने त्या महिला रुग्णावर उपचार सुरु केले. रुग्णांच्या नातेवाईक यांची परवानगी मिळाल्यावर डॉ नितीन सिंग आणि अमोल रावत यांच्या पथकाने गुडघा प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. रुग्णावर डॉ. नितीन सिंग आणि डॉ अमोल सातव यांनी यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पार पडली. रायगड जिल्ह्यातील गुडघा प्रत्यारोपणाची ही पहिलीच शस्त्रक्रिया रायगड हॉस्पिटल ने करून त्यांच्या यशात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे. या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी योजना राबविण्यात येत असून गरीब रुग्णावर त्या योजनेतून शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत. या रुग्णालयात हृदयविकाराच्या अनेक शस्त्रक्रिया मागील काही महिन्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी रायगड हॉस्पिटल रिसर्च सेन्त्रेया हक्काचे रुग्णालय बनत आहे.







