जमिनीच्या वादातून कर्जतमध्ये चाकूहल्ला

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तहसील कार्यालयाच्या दरवाजासमोर सावर गाव येथील शेतकरी कुटुंबातील जुना वाद उफाळून आला. त्या वादाचे रूपांतर चाकूने हल्ला होण्यापर्यंत झाले. जखमी झालेले तरुणाचे नाव रणजीत करताडे असून तो तरुण सध्या नवी मुंबईतील एमजीम रूग्णालयात उपचार घेत आहे. सावरगांव येथील तरुण रणजित करतडे हे शासकीय कामासाठी कर्जत तहसील कार्यालयात आले होते. जमिनीची तारीख असल्यामुळे ते तहसील कार्यालयाच्या बाहेरील दरवाजासमोर आले. तिथे उपस्थित असलेला त्यांचा मावसभाऊ कोषाने येथील विशाल शरद दाभणे आणि त्याची आई नीता शरद दाभणे यांच्यात करतडे यांची शाब्दिक वाद झाला.

त्यानंतर विशाल दाभने याने सोबत आणलेल्या चाकूच्या सहायाने रणजित करताडेवर चाकू हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या पाठीवर, खांद्यावर, हातावर चाकूच्या वार झाले होते. त्या जखमी स्थितीत रणजित हा आपली गाडी घेवून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेवून कर्जत पोलिसात आपल्यावर चाकू हल्ला झाला आणि उपचार घेतले. मात्र जखम मोठी असल्याने पोलिसांनी पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात हलवले आहे. या घटनेचा पुढील तपास सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड यांच्या आदेशानुसार कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू रसेडे हे करीत आहेत.

Exit mobile version