कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल: शिवसेनेनं दिली ‘टफ फाइट’ पण सत्ता मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचीच

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या भाजपालाही जोरदार धक्का दिल्ला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान देत काँटे की टक्कर दिली. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच विजय झालाय. यापूर्वी सत्ताधारी गटाने सहा जागा जिंकल्या असल्या तरी उर्वरित १५ जागांवर निवडणूका झाल्या ज्यात शिवसेनेनं अगदी जोरदार टक्कर सत्ताधारी गटाला दिली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी ,शिवसेना यांची सत्ता होती. मात्र जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेनेने स्वतंत्र आघाडी केली. तर भाजपाने सत्तारूढ गटाबरोबर राहणे पसंत केले. सत्तारूढ गटाचे नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील , सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे करीत होते. तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्तारुढ गटाला आव्हान दिले होते. शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये शेकापच्या मदतीने तीन दिग्गज पक्षांना थेट आव्हान देत टफ फाइट दिल्याचं चित्र दिसतंय.


सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. चाळीस टेबलवर मतमोजणी झाली. सर्वात शेवटी मागासवर्गीय गटातील मतमोजणी करण्यात आली. प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सत्तारूढ गटाचे उमेदवार माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला आहे. अर्जुन हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. त्यांनी याच गटात विद्यमान संचालक अनिल पाठवून हेही पराभूत झालेत. आबिटकर यांना ६१४ मतं मिळाली तर आवाडे यांना ४१६ मतं मिळाली.

मतं –
मदन कारंडे – १२२ मतं
बाबासाहेब पाटील असुरलेकर – ३२९ मतं
प्रदीप पाटील भूयेकर – ११९ मतं
संजय मंडलिक – ३०६ मतं

Exit mobile version