। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीचा दुष्काळ पडल्याचे पहावयास मिळत आहे. तालुक्यातील वाशी हवेली रहाटाड, मांदाड, आदी गावांतील कोळी बांधवाना मोठी कसरत करावी लागत आहे. मच्छी मिळत नसल्याने कोळीबांधवां समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे मच्छी कमी का झाली आहे. त्यामुळे अनेक कोळीबांधव सध्या मच्छी मारण्यासाठी समुद्रात जात नाहीत. तरीही त्यातूनही एक दोन कोळीबांधव मच्छी मारण्यासाठी समुद्रात गेले आणि थोडी थोडकी मच्छी मिळाली तरी मच्छीला बाजारात भावही कमी मिळत असल्याने तांडेल व त्याचा सहकारी व डिझेल यांचा खर्च देखील निघत नाही. तसेच हल्ली पडलेल्या मच्छीच्या दुष्काळामुळे कोळी बांधवांना अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे.