। कोलकाता । वृत्तसंस्था ।
सरकारी जमिनीचं मनमानी पद्धतीने वाटप केल्याचं निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दंड ठोठावला आहे. न्यायालयाने गांगुली यांनी पश्चिम बंगाल हाऊसिंग इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशनला शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी दिलेल्या जमिनीचं वाटपही रद्द केलंय. यावेळी उच्च न्यायालयाने कायदा सर्वांना समान आहे, कुणीही अतिविशेष असल्याचा दावा करु शकत नाही, असंही निरिक्षण नोंदवलं आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अर्जित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने जमीन वाटपातील हिडकोच्या वर्तनवावर गंभीर नाराजी व्यक्त केली आहे.