राबगाव कबड्डी स्पर्धेत कोळवे विजयी


|पाली|गोमाशी|
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने शिवतेज मित्र मंडळ राबगाव यांच्या वंतीने जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये ज्ञानेश्‍वर कोळवे हा संघ विजयी झाला या संघास रोख रक्कम 21 हजार रु व आकर्षक चषक,तर उपविजेता मानकरी चौंडेश्‍वरी कडसुरे या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक मिडलाईन कर्जत संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमाक वायुसुत ओढांगी या संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आदित्य म्हात्रे( कोळवे) उत्कृष्ट चढाई निखिल शिर्के (कडसुरे)उत्कृष्ट पक्कड साहिल पाटील(ओढांगी ) पब्लिक हिरो धीरज बैलमारे (कर्जत) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version