कोकण विभागीय जलतरण चषक स्पर्धा उत्साहात

| खोपोली | प्रतिनिधी |

कर्नाळा स्पोर्टस क्लब येथे स्वीम अ‍ॅण्ड स्पार्कचे मदन कटेकर याच्या संकल्पनेतून कोकण विभागीय जलतरण स्पर्धांचे आयोजन आले होते. स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी संदीप कदम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे, संचालक डॉ. प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, तालुका क्रीडा मार्गदर्शक मनिषा मानकर, कॅप्टन उदय सुर्वे या सर्व मान्यवरांच्या उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी जलतरण चषक – 2023 स्पर्धेत पोहण्याच्या फ्री स्टाईल, ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाई अशा प्रकारात विविध आठ वयोगटातील एकूण 507 पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला.

स्पर्धेतील विजेते
1. मास्टर्स पुरुष गट दीपक ठाकूर, मास्टर्स महिला गट हेमांगी गावंड,
2. खुल्या पुरुष गटात सुचित पाटील, खुल्या महिला गटात स्वराली म्हात्रे,
3. 17 वर्षा मुले शुभम जोशी, 17 वर्षा खालील मुली रिया शर्मा,
4. 14 वर्षा खालील मुले अथर्व पाटील, 14 वर्षा खालील मुली दक्षाजा देव उपरती ,
5. 12 वर्षा खालील मुले शंतनु कैचे, 12 वर्षा खालील मुली अमिता रुद्रा,
6. 10 वर्षा खालील मुले रायान सय्यद, 10 वर्षा खालील मुली निधी सामंत,
7. 08 वर्षा खालील मुले प्रिन्स काठावळे, 08 वर्षा खालील मुली माही जांभळे,
8. 06 वर्षा खालील मुले इब्राहिम खान, 06 वर्षा खालील मुली नायरा पटेल.

स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. जयंत पाटील, कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्‍वकार, माजी नगरसेवक गणेश कडू, प्रा. प्रशांत माने, प्राचार्य, विकास चव्हाण, श्री. लाटे कटेकर, संचालक, स्विम एन स्पार्क आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्रा. जयवंत माने, किशोर पाटील, सचिन शिंगरूट, निळकंठ आखाडे, हितेश भोईर, ओमकार कोळी, सार्थक पाटील, अनिकेत सुपाले, पियुष नाथी, मितेश पाटील, संदीप यादव, गणेश गाडगे सचिन जामले, अमित मौले, प्रशांत ठाकूर, संकेत म्हात्रे, समर्थ नाईक, ऋग्वेद पाटील, मोडकर, कैलास आखाडे, निशिकांत पवार, चंद्रशेखर पाटील, अविनाश लोखिनले या सर्वांनी पंच व इतर ऑफिसर्स म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी किरण मढवी , समीर रेवाळे, प्रा. रेखा धवन, शिल्पा कटेकर आणि सृष्टी कटेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Exit mobile version