आम्ही गिरगांवकर टीमला कोकण गौरव पुरस्कार

| म्हसळा । वार्ताहर ।
हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड यांच्यातर्फे रविवार (दि. 9) रोजी चिपळूण येथे लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे सभागृहात आठवा राज्यस्तरीय कोकण गौरव पुरस्कार 2022 संपन्न झाला. त्यात मुंबईतील टीम आम्ही गिरगांवकर राबवित असलेल्या रंग दे माझी शाळा आणि शैक्षणिक सायकल स्वारी ह्या उपक्रमाची दखल घेऊन कोकण गौरव पुरस्कार 2022 ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा विनाशुल्क रंगरंगोटी करून देण्यात येत आहेत. तसेच बर्‍याच ठिकाणी शालेय विद्यार्थी रोज काट्या-कुट्यातून 4 ते 5 किमी पायपीट करीत शाळा गाठतात, अशा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सायकल स्वारी उपक्रमाअंतर्गत निःशुल्क सायकल भेट देण्यात आल्या. सदर पुरस्कार टीमचे सचिव मिलिंद वेदपाठक, कार्यकारिणी सदस्य नागेश पोतदार यांनी स्वीकारला.

Exit mobile version