| उरण | वार्ताहर |
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत (दि.10) जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर इच्छुक आहेत. त्या संदर्भातचे निवेदन अॅड. ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. दरम्यान, अॅड. प्रवीण ठाकूर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक आपण लढविण्यास इच्छुक आहोत, असे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी, असेही त्यांनी म्हटले आहे. अॅड. प्रवीण ठाकूर यांनी आपला असलेला जनसंपर्क, वकिली व्यवसायात 30 वर्षांहून अधिक काळ सक्रीयता, शिवाय वडील स्व. मधुकर ठाकूर हे काँगेसचे येथील आमदार होते, हेदेखील नमूद केले आहे.