कोकण हॉस्पिटलला मिळणार नवसंजीवनी

लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज
। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील कोकण हॉस्पिटलला जेएसबीआर ग्रुप बशीर हजवाने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बशीर हजवाने यांच्या विशेष सहकार्याने व आखाती देशात नोकरीनिमित्त असणारे मोर्बा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रहिमतुल्लाह राऊत यांच्या प्रयत्नांनी नवसंजीवनी मिळाली असून हे हॉस्पिटल बशीर हजवाने फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आले असून लवकरच हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याने या संपूर्ण परिसरातील नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. या रुग्णालयासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या कार्डियाक वातानुकूलित रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि.17) बशीर हजवाने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर हजवाने यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.


यावेळी मौलाना अशफाक, ज्येष्ठ नेते अली कौचाली, इकबाल धनसे,अस्लम राऊत, अब्दल्ला गंगरेकर, मोर्बा मेडिकल सोसायटीचे अध्यक्ष महम्मदसाले राऊत, सचिव डॉ.मैनुद्दीन राऊत, याकूब चिलवान, इस्माईल धनसे, डॉ.आयुब ढोकळे, डॉ.अबू राऊत, डॉ.अन्वर खान, लतीफ बंदरकर, सुलेमान म्हैसकर, अल्ताफ धनसे, मोहसीन राऊत, इकबाल हर्णेकर, हनीफ राऊत, मौलाना सरफराज जालगावकर, अकबर ताज, शौकत रोहेकर, नुरुद्दीन जालगावकर, अब्दल्ला जालगावर, अजीज गंगरेकर आदींसह अनेक मान्यवर तसेच मोर्बा मुस्लिम समाज बांधव व परिसरातील बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version