कोकण रेल्वे मार्गाची खा. तटकरेंकडून पाहणी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरातील निजामपूर रस्त्यापासून काळ नदी पुलापर्यंत कोकण रेल्वे दुपदरीकरण करताना टाकलेल्या भरावामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी तुंबून लोकांची गैरसोय होते. याबाबतच्या तक्रारीनंतर खा. सुनील तटकरे यांनी तातडीने सोमवारी माणगावात येऊन शहरातील रेल्वे मार्गाची पहाणी करून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

माणगाव शहरात कोकण रेल्वेने उंच भराव टाकल्यामुळे कचेरी रोड रस्त्याजवळील रेल्वेच्या पुलाजवळ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. तसेच पूर आल्यानंतर पाणी जायला जागा नसल्याने लोकांच्या घरात पाणी शिरते आणि याला केवळ कोकण रेल्वे जबाबदार आहे. यामुळे खा.सुनील तटकरे यांनी संतप्त होऊन कोकण रेल्वेच्या अधिकार्‍यांना कडक सूचना देऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

शहरातील कोकण रेल्वे मार्गाची खा.सुनील तटकरे पहाणी करताना त्यांच्या समवेत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे, नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी उपनगराध्यक्ष संदीप खरंगटे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, पं.स.सदस्य शैलेश भोनकर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, तहसिलदार प्रियंका आयरे कांबळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version